Balanced Fund

Pension Plans for Retirement

 

 

मनी अकॅडमी  प्रस्तुत

मिशन आर्थिक साक्षरता

सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन

अजय आणि विजय दोन जिवलग मित्र लहान पणापासूनची मैत्री आहे. दोघे राहायला शेजारी शेजारी होते. दोघे एकाच शाळेत शिकले पुढे कॉलेज हि एकत्र केले. मजेचा पार्ट म्हणजे दोघे एकाच कंपनीत कामाला लागले. या हि पुढे त्यांना सारखाच पगार होता. दोघांची पद उन्नती सुद्धा समान गतीने झाली. आणि दोघे मार्च २००२ मध्ये एकाच दिवशी रिटायर झाले.

दोघांचा रिटायरमेंट फंड देखील समान होता १० लाख रुपये. मुलाची शिक्षण; लग्न इ. सर्व जवाबदाऱ्या पूर्ण झालेल्या होत्या. मुले कामधंद्याला लागलेली होती. आत्ता फक्त स्वतः साठी जगायचे होते. मग दोघानी ठरवले कि मिळालेले दहा लाख रुपये बँकेत टाकायचे व मिळणाऱ्या व्याजावर मस्त जगायचे. त्या साठी त्यांनी बँक सुद्धा एकाच निवडली SBI  बँक. बँकेत दोघे बरोबर गेले दहा दहा लाखांची फिक्स डिपॉसिट करायची आहे असे बँकत कर्मचाऱ्याला सांगितले. परंतु हे सांगत असताना बँक मॅनेजर मागे उभा राहून ऐकत होता. त्याने त्या दोघांना केबिन मध्ये बोलावून घेतले. चहा मागवला. अजय विजय मात्र एकमेकांकडे बघून काय चालले आहे ? हे इशाऱ्याने विचारात होते. बँक मॅनेजर चहा घेत बोलले ” बँकेत FD करण्यासाठी आलात वाटते ?” तात्काळ विजय ” हो तर रिटायरमेंट रक्कम आली आहे आत्ता तो तर आमचा आधार आहे” मॅनेजर कप खाली ठेवत “घरातल्या जाबदाऱ्या कोण सांभाळत ?” विजय शेवटचा चहाचा घोट संपवून ” आमची मुलं फार चांगली आहेत न सांगता मुलांनी सर्व जबाबदाऱ्या उचल्या आहेत; आम्हाला आत्ता कोणतीच आर्थिक जबादारी नाही ” मॅनेजर काही विचार करत ” तसे पाहता तुम्हाला रेग्युलर पैश्यांची गरज नाही?” अजय जो विजय आणि मॅनेजरचे बोलणे मन लावून ऐकत होता तो शेवटी बोलला ” मग आमच्या छोट्या मोठ्या गरजेला आम्ही मुलांना पुढे हात पसरायचे  का ? आम्हाला महिन्याला नाही तरी ४-६ महिन्याला पैसे लागतील ना ” विजय अजय ला मधेच थांबवत ” तशी आमची मुले कश्याला नाही म्हणार नाहीत” मॅनेजर एक कागद पुढे करत  ” तर मग तुम्ही FD न करता म्युच्युअल फंड च्या बॅलन्स प्रकारात पैसे टाका. महिन्याला किंवा तीन महिन्याला बँक व्याज जेव्हडे आहे तेव्हडे पैसे काढा. तुमचे पैसे हि वाढतील आणि तुम्हाला व्याजही मिळेल. थोडा  मार्केट वरखाली जाण्याचा धोका आहे परंतु तुम्हाच्या बोलण्यावरून मला तरी असे वाटते कि तुम्हाला हे पैसे १०-१५ वर्ष लागणार नाहीत त्या मुले मार्केटचा वर खाली जाण्याचा धोका फार कमी होईल” अजय वाकडी मन करत ” आम्हाला FD करायची आहे. तुम्हाला नको असेल तर आम्ही दुसऱ्या बँकेत जातो जे माहित नाही त्या गावाला आम्ही जाणार नाही” मॅनेजर तात्काळ ” मग माहिती करून घ्या फायदा तुमचाच आहे ” विजय अजयला ” माहिती ऐकायला काय हरकत आहे ?” विजय मॅनेजरकडे कुतूहलाने ” मग हे म्युच्युअल फंड मध्ये कुठे पैसे टाकायचे ?” मॅनेजर समजावत ” म्युच्युअल फंड हे बँकांचे व NBFC म्हणजे नो बँकिंग फाइनसिल सर्व्हिसेसचे असतात. आपल्या SBI चा सुद्धा म्युच्युअल फंड आहे ” आणि मॅनेजरने सर्व समर्पक माहिती अजय व विजयला दिली त्याचे फायदे धोके सर्व त्यांना सांगितले. दीर्घ कालावधी  मध्ये फायदे अधिक तर धोके कमी होते.विजयला सर्व पटले होते तर अजय ला हे सर्व खोटे बनाव व फसवेगिरी वाटत होती. जिवलग मित्र असलेले अजय व विजय पहिल्यांदा या विषायवरती भांडत होते. सर्व  माहित करून सुद्धा अजय या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्याला त्याची चॊकट तोडायची नव्हती. तर विजय मात्र नवीन व खात्री दायक प्रयोग करायला तयार झाला होता.

विजयने SBI बॅलन्स फंडात  १० लाख टाकले व अजयने SBI मध्ये १० लाखाची FD केली. विजयने ७०००/- महिना SWP ( सिस्टमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन )घेतला तर अजयला ७०००/- महिना व्याज सुरु झाले. अजयला खात्रीशीर ७०००/- व्याज मिळणार होते परंतु त्याचे पैसे कायम तेवढेच राहणार होते. विजयला हि ७०००/- महिना मिळणार होता परंतु त्याचे पैसे वाढण्याचे चान्स भरपूर वाढले होते.

आज आपण १ मार्च २०१८ मध्ये आहोत. अजय विजय दोघेही ठणठणीत आहेत. परंतु अजय आज भविष्याची चिंता करत आहे कारण त्याने जी FD २००२ मध्ये केली होती ती १० लाखाचं आहे. आलेले व्याज सर्व खर्च झाले आहे. विजय मात्र धमाल जगात आहे. कारण त्याने जे बॅलन्स फंडात  पैसे टाकले होते ते 7,902,273 झाले आहेत. आज पर्यंत विजयाने महिन्याला ७०००/- काढून खर्च केलेली रक्कम 1,309,000 ( तेरा लाख नऊ हजार ) आहे म्हणजे विजयचे मागील १५-१६ वर्षात  9,211,273 (९२ लाख ) झालेले आहेत. या महिन्या पासून विजय महिन्याला ५००००/- ( पन्नास हजार ) काढून घेणार आहे. मात्र अजय ७०००/- महिन्याला येतील का नाही व या पैशात कसे भागवायचे या विवंचनेत आहे. अजयला हि सर्व समजले होते त्यालाही विजय प्रमाणे पैसे गुंतवता आले असते परंतु सर्व समजून न समजल्यासारखे केल्या मुळे  त्याच्यावर हि वेळ आली. झोपलेल्याला जागे करता येईल परंतु झोपेचे सोंग करणारांला जागे कसे करणार.?

जग बदलत आहे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले आहेत परंतु बरेच लोक जाणून बुजून त्या पर्यायाकडे दुर्लक्ष करत आहेत. परंतु त्याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. ‘ जानोगे तो मानोगे और करोगे तो तरोगे वरणा मरोगे ‘

मार्च २००२ ला आपण त्या वेळेच्या खालील कोणत्याही फंडात पैसे टाकले असते तर त्याचे आजचे २/०३/२०१८ चे मूल्य खालील प्रमाणे असते.

Amount Invested Monthly Withdrawal Total Withdrawal Remaining Fund Value
Aditya Birla Sun Life 1,000,000.00 7,000.00 1,344,000.00 4,315,453.35
HDFC Balance Advantage Fund 1,000,000.00 7,000.00 1,344,000.00 16,451,860.45
SBI MAGNUM GLOBAL FUND 1,000,000.00 7,000.00 1,344,000.00 16,097,897.77
Franklin India Equity Hybrid Fund 1,000,000.00 7,000.00 1,344,000.00 8,181,851.59

लक्षात ठेवा एखादा फंड परतावा देत आहे व दुसरे फंड परतावा देत नाहीत तर गफलत आहे परंतु सर्व फंड परतावा देत असतील तर ते खरे समजावे. हे सर्व रक्कम खरे आहेत.

माहिती अभावी आपण चुकीच्या गुंतवणुकी करतो. योग्य माहिती देणारे मार्केट मध्ये लोक मिळत नाहीत. म्हणून आम्ही या अश्या आर्थिक ज्ञाना साठी एक ” आर्थिक साक्षरता कोर्स घेतो. या मध्ये तुम्हाला पैसे कमावण्याच्या व वाढवण्याच्या भरपूर टेक्निक शिकवतो.

तुम्ही डायरेक्ट आर्थिक साक्षरता या कार्यक्रमाला येऊ शकता. किंवा फ्री डेमो साठी नाव नोंदवू शकता.

फ्री डेमो साठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://bit.ly/2QoRehW

 

आकाश गोंदवले
द मनी अकॅडमी

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)